प्रसन्न उदार याने बनवले हुबेहुब अयोध्येतील श्रीराम मंदिर

0

शेंदुर्णी ता.जामनेर ;– येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असुन भारतभर नाही तर जगभरात सगळीकडेच राममय वातावरण तयार झाले आहे. भारतात विविधधार्मिक विधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.असंख्य भाविक आपल्याला परीने रामरायाच्या चरणी आपल्या भावना, सेवा, प्रार्थना करत असुन पृष्ठाच्या पासुन अगदी हुबेहुब अयोध्येतील प्रुभ रामरायाच्या मंदिराची प्रतिकृती जामनेर येथील चिमुकला प्रसन्न महेशराव उदार याने साकारली असुन मंदिर बघण्यासाठी, त्याच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी होत आहे.

एक महिना यासाठी कालावधी लागला आहे. यासाठी माऊंटबोर्ड व साधे पृष्ठ याचा उपयोग मंदिर बनवण्यासाठी तसेच मंदिराच्या खांबासाठी दोऱ्याच्या रीळ संपल्यावर उरतात त्या पुंगळ्यांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. अतिशय सुंदर, नाजुक, नक्षीकाम केलेले, आतमध्ये लाईट,तीन दिशेला दरवाजे,पायऱ्या,तीन मजली मंदिर, उंच कलश,त्यावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज अगदी हुबेहुब अयोध्येतील प्रभु राममंदिर आहे असाच अनुभव सगळ्यांना येत आहे.
प्रसन्न उदार जामनेर येथील माळी गल्लीत राहतो सध्या जळगाव च्या गोदावरी फाऊंडेशन च्या महाविद्यालयात पाललेटेक्निक च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. या आधी केदारनाथ येथील मंदिर, गदरवर्षी स्वतःच्या हाताने बनवलेला शाडु मातीचा गणपतीची स्थापना त्यांच्या घरी केली जाते. गणेशोत्सव व महालक्ष्मी च्या समोर हुबेहुब पालखी,झोपडी,वडाचे झाडं तसेच असंख्य डेकोरेशन, प्रतिकृती साकार केलेल्या आहेत. तो अभ्यासत हुशार असुन,उत्तम वक्तृत्व, चित्रकार, मुर्तीकार, इलेक्ट्रिक वस्तुंच्या आधारे अनेक उपकरणे,ए.टी.एम.मशीन आदी सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरलेले आहे.

शेंदुर्णीच्या श्रीराम मंदिरात आता हे मंदिर दर्शनासाठी ठेवण्यात येणार असुन भव्य शोमायात्रेत सुद्धा त्याची मिरवणुक काढण्यात येणार आहे .प्रसन्न हा जामनेर न्यायालयातील वरिष्ठ लिपिक महेश उदार व कवयित्री सौ.स्वाती उदार यांचा चिरंजीव आहे. त्याच्या या कलाकृतीचे सगळ्यांच्या कडुन कौतुक होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.