लोकशाही न्यूज नेटवर्क
केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी भारतात अनेक प्रकारचे घरगुती उपाय केले जातात. कारण, आपल्या देशाला आयुर्वेदाची हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे, अनेक जण आयुर्वेदिक पद्धतीने केसांची आणि त्वचेची काळजी घेतांना दिसतात. या आयुर्वेदिक उपायांचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामुळे केसांना आणि त्वचेला मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात.
या आयुर्वेदिक उपायांमध्ये जांभुळ या फळांचा देखील समावेश आहे. जांभळाच्या मदतीने तुम्ही तुमचे केस निरोगी आणि चमकदार ठेऊ शकता. पोषकतत्वांनी युक्त असलेल्या जांभळाचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. जांभळाचा वापर करून तुम्ही केसांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता.
जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. हे पोषकघटक केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. तसेच, जर तुमच्या डोक्यात कोंडा असेल तर जांभळाच्या बियांचा वापर करून तुम्हाला ही कोंड्याची समस्या दूर करता येईल. केणची निगा राखण्यासाठी जांभळाचा वापर पुढील पद्धतीने करू शकतो.
जांभळाच्या बियांची पावडर
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि केस सिल्की राहावेत यासाठी तुम्ही जांभळाच्या बियांची पावडर करू शकता. यासाठी जांभळाच्या बिया उन्हात वाळवा. त्यानंतर, त्याची बारीक पावडर तयार करा, आता या पावडरमध्ये मेहंदी मिक्स करा. यात तुम्ही कोरफड जेल देखील मिसळू शकता. त्यानंतर, ही पेस्ट केसांना लावा. ३०-३५ मिनिटांनी केस धुवून टाका. यामुळे, केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल आणि केस दाट होतील.
जांभळाच्या बियांचा हेअरमास्क
जांभळाच्या बियांचा हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वात आधी जांभळाच्या बिया उन्हात वाळवा. त्यानंतर त्याची बारीक पावडर तयार करा, आता एक बाउल घ्या, या बाऊलमध्ये ४-५ चमचे जांभळाच्या बियांची पावडर घ्या, त्यानंतर त्यात १ वाडी दही मिसळा, यामध्ये तुम्ही मध देखील मिसळू शकतात. आता तुमचा हेअरमास्क तयार आहे. हा हेअरमास्क केसांना लावा. त्यानंतर, ४५ मिनिटांनी केसांना शॅंम्पू लावा आणि केस धुवून टाका. या हेअर मास्कमुळे तुमच्या केसांना छान चमक येईल आणि केसांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होईल.