गर्भगृहात रामलल्ला विराजमान ! पहिला फोटो आला समोर (व्हिडीओ)

0

अयोध्या, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यापूर्वी १८ जानेवारी रोजी गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली असून पहिला फोटो देखील समोर आला आहे.

https://x.com/ANINewsUP/status/1747798432365060528?s=20

अयोध्येत विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. गर्भगृहातील या फोटोमध्ये मंदिराचे बांधकाम करणारे कामगार हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच इतकी आहे.

मूर्तीला आसनावर स्थापन करण्यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागला. मंत्रउच्चार विधी आणि पूजा केल्यानंतर मूर्ती आसनावर विराजमान झाली. यावेळी मूर्तीकार आणि अनेक भाविक देखील उपस्थित होते. बुधवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने राम मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. त्याचे फोटो देखील समोर आली आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी त्यांचे आसनही तयार करण्यात आले आहे. रामलल्लाचे आसन ३.४ फूट उंच आहे, जे मकराना दगडाने बनलेले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.