कोचुर येथे मारोती मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ

उद्योगरत्न नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते पायाभरणी

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर येथील कोचुर गावामध्ये भगवान श्रीरामचंद्र यांच्या आशीर्वादाने व साधुसंतांच्या मार्गदर्शनाने तसेच कोचुर वासियांच्या सहयोगाने श्री मारोती मंदिराची पायाभरणी समारंभ २३ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

मंदिराची पायाभरणी उद्योगरत्न नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते होणार आहे. धारीवाल उद्योग समूह पुणे येथील शोभा धारीवाल, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, ज्ञानोदय विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे येथील प्राचार्य प्रेमचंद तिवारी, जी. डी. सी. ए. ठाणे उमाकांत शिंपी, गादीपती सोमवारगिरी मढी सावदा येथील कृष्णगिरीजी गुरु कैलासगिरीजी महाराज, श्री कशी विश्वेश्वर महादेव मंदिर येथील विठ्ठल महाराज शेंदुर्णी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यक्रम मारोती मंदिर जीर्णोद्धार स्थळ, कोचुर बु ।। ता. रावेर जि. जळगाव या ठिकाणी होणार आहे. तरी या समारंभाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री मारोती मंदिर ट्रस्ट, कोचुर मारोती बलसेना व ग्रामस्थ, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष सचिव मनोज परदेशी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.