राष्ट्रवादीकडून ॲड. खडसे, कैलास पाटलांची नावे चर्चेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारांचा शोध सुरु असतांना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर व चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांचे नावे चर्चेत आले आहेत.

भाजपाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवाराचा शोध राष्ट्रवादीकडून घेतला जात आहे. जिल्हा बैठकीत चौघांनी इच्छा व्यक्त केली असली तरी अन्य इच्छुकांचा शोध घेतला जात आहे.

चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादीला साद घातली आहे, तर ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी भाजपाला रामराम करुन राष्ट्रवादीला बळ दिले आहे. रावेर लोकसभेसाठी कैलास पाटील व रोहिणी खडसे यांचा उमेदवारीसाठी विचार होवू शकतो अशी चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.