मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ या पत्रकारांच्या संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी खानापूर येथील दै. सामनाचे रावेर तालुका प्रतिनिधी कुमार नरवाडे यांची जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारिणी या सर्वांच्या उपस्थितीत एकमताने निवड करण्यात आली.
दि 24/12/ 2023 रोजी रावेर येथील सावदा रोडवरील रेस्ट हाऊस येथे सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सर्वानुमते कुमार नरवाडे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून तर दै. लोकशाहीचे खानापूर येथील प्रतिनिधी गणेश शेठी यांची जिल्हा सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर शेख यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यकारणीचे योगेश पाटील, अतुल विंचुरकर, राहुल जैन, ईश्वर शर्मा तसेच मुक्ताईनगर ता.अध्यक्ष राजेंद्र देशमुख, रावेर ता.अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष ईश्वर महाजन व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी संघटना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार व मला सर्वांचे सहकार्य मिळाल्यास विश्वगामी पत्रकार संघास गावागावातील पत्रकारांना सोबत घेऊन प्रत्येक तालुक्याची लवकरच कार्यकारणी तयार करण्यात यश येईल, असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष कुमार नरवाडे यांनी केले.