नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री हे नेहमीच चर्चेत असतात. आता ते लग्नावरून चर्चेत आले आहेत.ते लवकरच लग्न करणार आहेत. लग्नावरुन वक्तव्य करत म्हणाले की, “आता मीच आईला सून शोधायला सांगतोय, मी लग्न करणार आहे. आई-वडिलांची आज्ञा मिळताच लग्नाच्या बोहल्यावर उभा राहीन”.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम येथे कथा वाचन करत होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका पत्रकाराने त्यांना तुमच लग्न कधी होणार? म्हणून प्रश्न विचारला. त्यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हसून उत्तर दिलं. लग्नाची चर्चा ऐकून मी पकलोय. आता मीच आईला सून शोधायला सांगतोय. काही पत्र येतायत, त्यामुळे लवकरच लग्न करणार असं आईला सांगितलय. त्यात धमकीची भाषा आहे, तुम्ही वरात घेऊ आला नाहीत, तर आत्महत्या करणार म्हणून. आता असे लवेरिया पत्र येत आहेत. म्हणून आम्ही एक व्हिडिओ पब्लिश केलाय. असं कोणी करु नका म्हणून आम्ही आव्हान केलय. गुरु आणि आई-वडिलांची आज्ञा मिळताच आम्ही लग्न करु असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.