Browsing Tag

Chopda

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

लासूर येथे धाडसी चोरी ; हजारोंचा ऐवज लंपास

लासूर ता.चोपडा(;- अज्ञात चोरट्यांनी बसस्थानक परिसरातील काही दुकाने तसेच गावातील २ घरे फोडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान इंदुबाई बापू माळी तसेच श्रीराम गोपाल पालीवाल यांचे घराचे कुलूप तोडून धाडसी चोरीच्या प्रकार…

लासूर किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळ निवडणुकीसाठी १२९ नामनिर्देशन

लासूर ता. चोपडा:-येथील किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या बिगुल वाजला असून निवडणुकीकरीता नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाली.दि.१२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या कालावधीत एकूण १२९ अर्ज…

लासूर येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारी केंद्राच्या वतीने रक्षाबंधन

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथे‌ प्रजापिता ब्रम्हाकुमारी‌ चोपडा केंद्राच्या माध्यमातून लासूर केंद्रात रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चोपडा केंद्राच्या संचालिका मंगला दिदि,राजदिदी‌ यांनी…

शिक्षण संघटनेचे कर्मचारी आ. तांबेंच्या भेटीला

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; नाशिक विभाग पदवीधर आमदार आ. सत्यजित तांबे यांची प्राथमिक व माध्यमिक संघटनेच्या पदाधिकारींनी भेट घेऊन त्यांना माध्यमिक,प्राथमिक शिक्षक बांधवांच्या प्रलंबित समस्या बाबत निवेदन दिले त्यात…

लाचखोर सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे  सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

तू मला आवडते असे सांगत महिलेचा केला विनयभंग

अडावद;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेला 'तू मला आवडते मला तुझ्या सोबत काम करू दे' असे सांगून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा अडावद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला…

चोपडा येथे अन्नत्याग सत्याग्रहला जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे यांची भेट

मनवेल ता.यावल : - चोपडा येथील तहसिल कार्यलया जवळ गोरगावले येथील समाजसेवक जगन्नाथ टी. बावीस्कर यांचा चोपडा तालुक्यातील सह जिल्हाभरातील टोकरे कोळी जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज संबंधित विभागाकडे प्रलंबित आहेत त्यांना टोकरे कोळी (एस.टी) चे…

चोपड्यात गावठी बनावटीची फूट रायफल हस्तगत

चोपडाः तालुक्यातील ग्रामीण पोलीस हद्दीत गलवाडे बुधगाव जवळ गावठी बनावटीची फूट रायफल आरोपितांकडून मिळून आली. दोन इसम मोटारसायकलवर जात असताना रात्रीची गस्त घालणारे पोलिसांना ह्या दोघावर संशय आल्याने ह्यांना थांबविण्यासाठी हटकले…

चोपड्यात एकाने घेतला गळफास

चोपडा ;- शहरातील मल्हारपुरा भागात एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की चोपडा शहरातील मल्हारपुरा येथील ब्रह्मकुमार दिलीप…

सुटकार येथे एकावर प्राणघातक हल्ला ; दोघांना अटक

धानोरा, ता. चोपडा ;-  सुटकार येथे किरकोळ वादातून एकावर धारदार गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी तिघांविरुध्द अडावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडावद पोलीस स्थानकांत ईश्वर हरी ठाकरे रा. सुटकार यांच्या फिर्यादीनुसार…

चोपड्यात बंद घरातून रोकडसह टीव्ही लांबविला

चोपडा ;- शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 57 हजार रुपयांची रोकड , टीव्ही ,सेट टॉप बॉक्स, चांदीचे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलीस…

लासूर येथील जवान देवाजी माळी देशसेवेतून सेवानिवृत्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: लासूर ता.चोपडा येथील रहिवासी हवलदार देवाजी रामा माळी नुकतेच भारतीय सैन्यात २४ वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. हवालदार देवाजी माळी मराठा लाईट इन्फेंट्री रेजिमेंट या तुकडीत देशसेवा…

बसमध्ये चढताना प्रवाशाची वीस हजाराची रोकड लांबवली

चोपडा ;-येथील बस स्थानकावर बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून वीस हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार 31 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता सुमारास घडला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दुचाकी चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या; अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

चोपडा ;-  शहरातील लोहाना पेट्रोल पंपाच्या परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीच्या तपासा प्रकरणी चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली असून चार दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. संजय नाना देवरे, रा. वडजाई, ता.…

लग्नात झालेला दोन लाखाचा खर्च आणून देण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

चोपडा;- शहरातील माहेर असलेल्या विवाहितेला आई-वडिलांकडून लग्नाला झालेला दोन लाख रुपयांचा खर्च घेऊन ये यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की धुळे येथील नवल…

खिडकीचे गज कापून चोरट्यांनी दीड लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

चोपडा :-घरातील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकारामुळे खळबळ उडाले आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

नकली कागदपत्रांवरून सिमकार्ड आणि मोबाईलची विक्री ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव;- जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील विक्रेत्यावर बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड व मोबाईल विक्री होत असल्याचे भारत सरकारच्या टेलीकम्यूनिकेशन विभागाकडून पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिलेल्या…

चोपड्यात धूमस्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

चोपडा ;- पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ३२ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी ओढून दुचाकीवरून धूम स्टाईल लांबविण्याची घटना शहरातील यावल रोडवरील एम.जी. कॉलेज समोर घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन…

तांदळवाडी येथे जागेच्या वादावरून ७ जणांची दाम्पत्याला लाठी-काठीने मारहाण

चोपडा ;- तालुक्यातील तांदलवाडी गावात जागेच्या वादावरून ७ जणांनी दांपत्याला लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केली तर महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

महाराजस्व अभियानांतर्गत चौगाव येथे सात बारा उताऱ्यांचे वाटप…

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोपडा येथे नव्याने रुजू झालेले तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दि. 10 जुलै रोजी "शासन आपल्या दारी" योजनेंतर्गत चौगाव येथे भेट दिली. महा राजस्व अभियानांतर्गत मौजे चौगाव ता. चोपडा येथे गट…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

चोपडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

चोपडा ;- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित " श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन "चोपडा संस्थेचा उन्हाळी २०२३ परीक्षेचा निकाल नुकताच एमएसबीटीई बोर्डाकडून जाहीर झाला. यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत तंत्रनिकेतन महाविद्यालयातील…

चोपडा राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब पाटील यांना पसंती

चोपड़ा.;- गेल्या अनेक वर्षा पासून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पद चांगल्या प्रकारे भूषवून अरुण भाई गुजराथी यांच्या सोबत कायम च सावली सारखे मागे उभे राहणारे राजेन्द्र पाटील यांनी नुकताच शिवसेनेत (शिंदे गट)प्रवेश केल्यामुळे रिक्त…

चोपडा तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

चोपडा ;- तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा धक्कदायक प्रकार २७ जून रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि तालुक्यातील एका…

लासूर ग्रामपंचायत वार्ड निहाय आरक्षण सोडत…

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: लासूर ता.चोपडा येथील ग्रामपंचायतीची जानेवारी महिन्यात मुदत संपल्याने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरीता आरक्षण सोडत काढण्यात आले आहे. आरक्षण सोडत काढण्याकामी मंडळअधिकारी बेलदार, तलाठी…

पूर्ववैमनस्यातून चोपड्यात एकावर चाकू हल्ला ; काही काळ बाजारपेठ बंद

चोपडा ;- शहरातील साने गुरुजी वसाहत भागात राहणारा आकाश भोई (२१) या युवकावर पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी चाकूहल्ला झाला. चोपडा शहरात मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात अफवा पसरल्याने पळापळ सुरू…

साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेले लाखोंचे दागिने घेऊन चोरटे फरार !

अकुलखेडा व चहार्डी फाट्याजवळील सौभाग्य लॉन येथील घटना चोपडा;- साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेल्या ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान…

पिपरपाडा येथे सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

चोपडा;- तालुक्यातील आदिवासी भागातील मुळ्यावतार गावानजीक असणाऱ्या पिपरपाडा या पाड्यातील आदिवासी मुलाचा दि. १८ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, मुळ्यावतार गावाजवळ…

चोपड्यातुन सव्वालाख किमतीच्या २५ बकऱ्या चोरल्या !

चोपडा ;- तालुक्यातील मौजे हिंगणे गावातील एका बकऱ्यांच्या शेड मधून अंदाजे सव्वा लाख रुपयांच्या २५ बकर्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

कुलरचा शॉक लागून ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: उन्हाच्या उकाड्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोक घरात थंडावा मिळावा म्हणून AC कुलर सारखे उपकरणे लावून घेतात. मात्र हे उपकरण कधी जीवावर बेततील याचा कोणालाही पत्ता नसतो.…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…

१४ वर्षाच्या मुलाचा ७ वर्षीय बालिकेवर अत्याचार

चोपडा (प्रतिनिधी) : --मोबाईलच्या वापरामुळे एका एका १३ वर्ष ९ महिन्याच्या मुलाने गावातीलच ६ वर्ष १० महिन्याच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकिस् आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलाला पळविले

मुक्ताईनगर ;- एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटनाशहरातील जुन्या गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारोळा ;- पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या

अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून…

भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…

जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ; वातावरणात गारवा

असह्य उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा ; जोरदार वाऱ्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाकसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गरजूंना वह्या वाटप

भडगाव ;- विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समिती च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे संच नुकतेच वाटप करण्यात आले. जवळपास सर्वच विद्यार्थी हे एकल माता पालकांचे पाल्य आहेत. यावेळी काही विद्यार्थ्यांच्या वतीने पालक…

अस्वलाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क गुरे चारण्यासाठी गेलेल्या एकावर अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक ०२/०६/२०२३ वार शुक्रवार रोजी तालुक्यातील शेवरेपाडा येथे घडली . टिकाराम जश्या बारेला असे जोखमीचे नाव आहे.…

वाटार येथे सिलेंडरचा स्फोट तीन घरे खाक ; दोन जण जखमी

धानोरा ता . चोपडा;- पासून जवळच असलेले वाटर तालुका चोपडा येथे भीषण आग लागून तीन घरे जळूनखाक झाली . गॅस नळीतून गळती झाली आणी नंतर गॅस सिलेडरचा स्फोट झाला. गावात हळदीची पंगत असल्याने लहान मुलांसह सर्वजन जेवन करण्यासाठी गेलेले असल्याने…

प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

चोपडा ;- अज्ञात चोरट्याने दीड लाख रूपयांचे दागिने बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरून नेल्याची घडना घडली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी अतुल शिंदे (वय-२७) रा. चुंचाळे ता. चोपडा…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर

चोपडा ;- चोपडा तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 23 वर्षीय तरुणाने गरोदर केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी अडावट पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव…

विद्यार्थ्यांचे बळजबरीने पैसे हिसकावून लोखंडी रॉडने मारहाण

चोपडा ;- शहरातील मुस्लिम कब्रस्थानजवळ एकास काहीही कारण नसताना त्याच्या खिशातील ८०० रुपये हिसकावून डोक्यात लोखंडी रॉड टाकून मारहाण केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

अचानक पेट घेतल्याने ट्रक अवघ्या काही मिनिटात खाक…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वेले आखतवाडे येथील बस स्टॅन्ड परिसरात १८ मे रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकने अचानक रस्त्यावर पेट घेतला. त्यामुळे वेले ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ माजली.…

सर्रास अवैध वृक्षतोडीने घेतला एकाचा बळी; कानाडोळा करणारे अधिकारी घेतील का जबाबदारी?

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अवैध लाकड़ाने भरलेल्या भरधाव ट्रैक्टरने एका मोटरसाइकलला जोरात धडक दिल्याची घटना 3 रोजी 8 ते 9 वाजेच्या सुमारास घडली. यात मोटरसाइकल स्वार जागीच ठार झाला असुन दूसरा गंभीर जखमी आहे. या…

चोपडा तालुक्यातून १६ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद हे सण लवकरच साजरे होणार आहेत. या काळात शांतता राहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तालुक्यातील १६ गुन्हेगारांना…

आडगावात तीन दिवसात 18 तास वीज पुरवठा खंडित..

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील आडगाव परिसरात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा सोडला तर वीजपुरवठा खंडित व्हायला दुसरे काही कारण नाही? परंतु तरीही वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे 18 तास…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

चोपडा येथे काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात मूक निषेध आंदोलन

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात गुजरात न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने व त्यानंतर लगेचच त्यांची खासदारकी रद्द झाल्याने त्याचे परिणाम देशभर उमटत असून चोपड्यातही काँग्रेसने छत्रपती…

विवेकानंद विद्यालयात दुर्गुणांची होळी साजरी करून समाजप्रबोधन

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील विवेकानंद विद्यालयात होळी या सणानिमित्त माध्यमिक विभागाच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी व काही उपक्रशील शिक्षकांनी शाळा व सभोवतालच्या आवार परिसरातील मोठ्या प्रमाणात पसरलेला प्लास्टिक घनकचरा…

विरवाडे येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील विरवाडे येथे 2 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाच्या घरी जावून दमदाटी व धक्काबुक्की करून चाकूचे वार करून तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी…

आश्रम शाळेतील मुलींची सुरक्षा वाऱ्यावर

लोकशाही विशेष लेख चोपड़ा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनाने आदिवासी पहाड़ी, दुर्गम भागात निवासी आश्रम शाळा सुरु केल्या. जुन्या काळात तर ये जा करायला वाहनही नसत. पण आजच्या आधुनिक युगात…

पुनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर बिबट्याने हल्ला चढवून यात गोऱ्हा ठार झाला ही घटना पुनगाव ता.चोपडा येथे शुक्रवारी रात्री ग्रा.प. सदस्य समाधान बळवंत बाविस्कर यांच्या खळ्यात घडली. यात…

महिलेच्या पर्समधील २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना चोपडा बस स्थानक येथे मंगळवारी दुपारी घडली. सूत्रांची माहिती अशी कि , रवींद्र मंगल पाटील (रा. वढोदा ता.चोपडा) हे आपल्या…