अस्वलाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

0

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क

गुरे चारण्यासाठी गेलेल्या एकावर अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना
आज दिनांक ०२/०६/२०२३ वार शुक्रवार रोजी तालुक्यातील शेवरेपाडा येथे घडली . टिकाराम जश्या बारेला असे जोखमीचे नाव आहे.
आज टिकाराम गुरे चारण्यासाठी जंगलात गेला असता तेथे अस्वलने जबर हल्ला चढवला

डोक्यावर ,पायावर, तोंडावर अस्वलने जबर हल्ला केला . या हल्ल्यानंतर आदिवासी समाज सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ , प्रताप बारेला , संजीव शिरसाठ, यांनी आ. लताताई सोनवणे व अडावद रेंज चे वनक्षेत्रपाल आनंदा पाटील यांना कळविले. टिकाराम बारेला यास जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. .त्याच्यावर डॉ मनोज पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. १०८ ॲम्ब्युलन्सने जळगाव सिव्हिल हॉस्पिटला पाठविण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल आनंदा पाटील साहेब व कर्मचारी उपस्थित होते. या जखमिस संजीव शिरसाठ,गणदास बारेला यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.