शिक्षण संघटनेचे कर्मचारी आ. तांबेंच्या भेटीला

0

 

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

नाशिक विभाग पदवीधर आमदार आ. सत्यजित तांबे यांची प्राथमिक व माध्यमिक संघटनेच्या पदाधिकारींनी भेट घेऊन त्यांना माध्यमिक,प्राथमिक शिक्षक बांधवांच्या प्रलंबित समस्या बाबत निवेदन दिले त्यात वैद्यकीय देयक प्रतिपूर्ति, सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचे प्रलंबित प्रकरणे देय रक्कमांना लागणारा वेळ व वरिष्ठ तसेच निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे याबाबत लेखी स्वरूपात साहेबांना निवेदन दिले.

आ. सत्यजित तांबे यांनी सदर सर्व समस्या सर्व पातळीवर लवकरात लवकर मार्गी लावु याबाबत हमी दिली. याप्रसंगी निवेदन देतांना योगेश सनेर संचालक ग. स. जळगाव धनराज वसंत बडगे जिल्हाकार्याध्यक्ष कास्ट्राईब कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य, माध्यमिक पतपेढीचे चेअरमन आर. एच. बाविस्कर, मंगेश भोईटे संचालक ग. स. जळगाव, प्रविण आबाजी पाटील अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक संघ चोपडा, प्रफुल्ल पाटील मुख्याध्यापक जि. प. काजीपुरा डी. जे. पाटील, सुनिल धनगर, शिरसाठ, रावसो. राजेश पाटील, प्रमोद देवरे, विवेक पाटील कें. प्र. कलाध्यापक संघाचे पंजाबराव बाविस्कर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.