पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे चंद्रयान ३: यशस्वी मोहिमेचा आनंदोत्सव!

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज चंद्रयान ३ मिशनच्या यशाचा उत्सव साजरा केला गेला. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्साहाने आणि हर्षाने या विजयाचे स्वागत केलं. प्रा. गोकुळ महाजन यांनी याप्रसंगी  विद्यार्थ्यांना संबोधित केले. अंतराळ संशोधन क्षेत्रात चांद्रयान-३ च्या यशस्वीतेतून भारताने अभूतपूर्व इतिहास रचला आहे. आपण सर्व भारतीय या आनंदमयी क्षणाचे साक्षीदार असल्याचा आम्हास गर्व व अभिमान आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या अथक प्रयात्नातून आपण चंद्राला गवसणी घातली आहे असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात त्यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेच्या टप्यात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या विक्रम लॅंडर आणि आणि प्रग्यान रोव्हर बद्दल माहिती दिली. ‘प्रज्ञान’ रोव्हर आणि ‘विक्रम’ लँडर पुढील १४ दिवसात चंद्रावरील भूगर्भ रचना, पाणी, बर्फ, खनिजे, भूकंपाचे पुरावे आणि अनेक बाबींचा अभ्यास करून ती माहिती इस्रो मिशन नियंत्रणाकडे पाठविण्यासाठी सज्ज आहे असे सांगितले.

यावेळी इस्रो प्रमुख एस सोमनाथ, एम शंकरन, पी विरमूयुवेल, एस उन्नीकृष्णन नायर व डॉ.के.कल्पना या वैज्ञानिकांनी आपल्या ५० हून अधिक सहकाऱ्यासमवेत चद्रयान-३ यशस्वीतेद्वारे भारताचा गौरवशाली इतिहास रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान-३ च्या अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी शाळेकडून विद्यार्थी व पालकांना थेट प्रक्षेपणाची लिंक पाठविण्यात आली होती त्याचा मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला.

देशाचा मान उंचाविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने प्रयत्नशील असावे असे मत मांडले. हातात तिरंगा घेवून ’भारत माता की जय’ आणि वंदे मातरम या घोषणांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी पोदार स्कूलचे उप-प्राचार्य दीपक भावसार, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.