भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही – आशिष पानट

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २५ शुक्रवार रोजी “इनोव्हेशन इन सायन्स – इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाचे इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजचे संचालक डॉ. आशिष पानट हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले हे उपस्थित होते. यावेळी संशोधकांनी सादर केलेले शोध निबंधाचे प्रोसिडिंग बुक प्रकाशित करण्यात आले.

परिषदेचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, महाविद्यालयात आम्ही “जर्नी ऑफ इनोवेशन स्टार्टअप अँड इंटरप्रनर्शिप” वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम सक्षम करणाऱ्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्रे घेण्याचे ठरल्याने याच अनुषंगाने रायसोनी महाविद्यालयात “इनोव्हेशन इन सायन्स – इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट” या प्रमुख विषयावर विचारमंथन करण्यासाठी हि परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना एकत्र आणणे हे असून जे विविध ठिकाणांहून या क्षेत्रात काम करतात आणि परिषदेत त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची देवाणघेवाण करतात. ही परिषद तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी “इनोव्हेशन इन सायन्स – इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट”  क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणे देत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एकूण १८० कॉपीराइट्स, ३५ पेटंट व ४० पेपर दाखल केल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले.

यांनतर कार्यशाळेचे प्रमुख वक्ते आशिष पानट यांनी देशाच्या युवकांमध्ये नवकल्पना आणि सृजनशीलतेला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक असून जर तुमच्याकडे उद्योगाची अनोखी आयडिया असेल तर यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही तसेच सध्या इनोव्हेशनची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. एखादा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते एखाद्या मशीनमधील अडचण शोधण्यासाठी इनोव्हेशनची आवश्यकता असते. कालानुरुप इनोव्हेशन हे क्षेत्र विस्तारत आहे. आज इतर क्षेत्राप्रमाणेच इनोव्हेशन क्षेत्रातही विद्यार्थ्यांना अनेक संधी खुणावत आहेत. इनोव्हेशन क्षेत्र, त्यात असलेल्या संधी आणि या क्षेत्राचा समाजासाठी जास्तीत-जास्त उपयोग कसा करावा याचं मार्गदर्शन डॉ. आशिष पानट यांनी रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना केलं प्राध्यापक, अभियंते ,उद्योग जगतातील व्यक्ती तसेच संशोधक विद्यार्थी यांनी कॉन्फरन्ससाठी सादर केलेले रिसर्च पेपर्स आयएसबीएन क्रमांक असलेल्या नामांकित प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत. विविध राज्यांमधून जवळपास १५४ पेपर या राष्ट्रीय परिषदेत सादर झाले त्यातून १२८ पेपरची निवड यावेळी करण्यात आली. या परिषदेत नामांकित शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. जळगाव व परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या गर्दीने सभागृह मोठ्या संख्येने भरले होते. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले तर यशस्वीतेसाठी प्रा. जितेंद्र वडद्कर, प्रा. तुषार वाघ, प्रा. योगेश वंजारी व आदीनी सहकार्य केले. तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.