२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत मतदार चेतना अभियान राबविणार – जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरची बैठक आज दि.२५ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी ०४ वा. भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे जिल्हाध्याक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम जेष्ठ नगरसेवक दत्तू कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रदेशाहून आलेल्या अभियानातंर्गत आज दि.२५ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर पर्यंत भव्य मतदार चेतना अभियान राबविण्यात येणार असून, याभियाना विषयी अभियानाचे प्रमुख नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी सविस्तर माहिती दिली. यानंतर दि.२७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन कि बात कार्यक्रमा विषयी जळगाव लोकसभा निवडणूक व अभियानाचे प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.

मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम पुन्हा आता १ सप्टेंबर पासून मंडलशः प्रत्येक शक्तीकेंद्र वरती घेण्यात येणार आहे, याविषयी माहिती अभियानचे प्रमुख जयेश भावसार यांनी दिली. दि. २३ ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेले चांद्रयान-३ यान हे यशस्वी रीत्या चंद्रावर उतरविले. त्याबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचा अभिनंदनचा ठराव जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर यांनी मांडला.

यांनतर जिल्हाध्यक्षा यांनी बैठकीला संबोधित करतांना सांगितले कि जळगाव जिल्हा हा संघटनात्मक अतिशय मजबूत असून प्रदेशाने दिलेल्या प्रत्येक कार्याक्रमाची अंमलबजावणी सर्व जिल्हापादाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी अध्यक्ष, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख यांनी मतदार चेतना अभियान, मेरी माटी मेरा देश अभियान, मन कि बात या कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक मंडल अध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुख यांनी मोठ्या प्रमाणात आयोजन करावे, असे आवाहन केले. सदर बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी केले. बैठकीला जिल्हा पदाधिकारी महेश जोशी, अमित भाटीया हे प्रमुख उपस्थित होते. तसेच जिल्हा पदाधिकारी नगसेवक, मंडल अध्यक्ष, आघाडी अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.