शिवरे येथे पंचवीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तालुक्यातील सांगवी येथील माहेर असलेली व शिवरे येथील सासर असलेली २५ वर्षीय विवाहितेचा सासरच्यांकडून छळ व विनयभंग झाल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सांगवी तालुका पारोळा येथील माहेर असलेली व शिवरे येथील सासर असलेली पंचवीस वर्षीय विवाहितेचा सासरकडील २ पुरुष व ४ स्त्रियांनी छळ केला तर यावेळी सासऱ्याने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केल्याने वरील सहा जणांविरुद्ध छळ, गांजपाट, विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुधीर चौधरी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.