होय, तुमच्या हक्काचा सात-बारा उतारा मिळणारच ! अतिक्रमणग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा..

0

 

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

बेघर असलेल्यांनी घरांची मागणी करणे हा त्यांचा हक्क आहे. “कुणी काहीही म्हटले तरी धरणगावातील अतिक्रमणग्रस्तांची जागा ही शासन निर्णयानुसार तुमच्या नावावर लागणार आहे. तुमच्या हातात सात – बारा मिळणारच !” टप्या-टप्याने सन 2011 पूर्वीची अतिक्रमित घरे नियमित करणार असून पहिल्या टप्यात 500 अतिक्रमित घरे नियमित करणार आहे. माझ्यासह प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अशा शब्दांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अतिक्रमणग्रस्तांना दिलासा देत आश्‍वस्त केले. अतिक्रमण धारकांनी संयम व सबुरीने प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव शहर बेघर संघर्ष समितीतर्फे आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बेघर अतिक्रमण समितीचे प्रमुख ऍड. वसंतराव भोलाणे यांनी सांगितले की, धरणगावातील अतिक्रमणग्रस्तांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यामुळेच हक्काची जागा मिळणार आहे. विशेष म्हणजे मोजणी फी सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने भरली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते रवी कंखरे व म्हणाले की, अतिक्रमित धारकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. तुम्हाला तुमचे हक्काचे घर मिळविण्यासाठी सोबत असून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 7/12 उतारे देण्यासाठी कटिबध असल्याचे सांगितले. भाजपाचे संजय महाजन यांनीही अतिक्रमण धारकांना आश्वस्त केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत धरणगाव नगरपालिका हद्दीतील संजय नगर, नेहरूनगर व गौतम नगर येथील अतिक्रमण घरांचा प्रश्न शासन निर्णयानुसार  लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. नशिराबाद येथील अपूर्ण बांधकाम असलेल्या घरकुले व अतिक्रमित घरकुले नियमित करण्याचा प्रश्न तसेच कुसुंबा येथील गट नंबर अतिक्रमण नियमित करण्यासाठी शक्ती प्रदत्त समितीने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा असे निर्देश ही पालकमंत्र्यांनी दिले होते तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अतिक्रमणग्रस्तांच्या प्रलंबित समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर सदरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

धरणगाव शहर बेघर अतिक्रमण संघर्ष समितीच्या सभासदांनी नगरपालिकेत निवेदन देण्यासाठी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या प्रसंगी शहर बेघर संघर्ष समितीतर्फे ना. गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी बेघर अतिक्रमण समितीचे प्रमुख  ऍड. वसंतराव भोलाणे व प्राध्यापक रवींद्र कंखरे, ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख संजय महाजन, उप जिल्हाप्रमुख पी. एम.पाटील सर,  भाजपाचे माजी गटनेते कैलास माळी, शिरीष बयस, एरंडोल प्रांताधिकारी मनीष गायकवाड, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव मुख्याधिकारी विकास नवले, पप्पू भावे, विलास महाजन, दिलीप महाजन, दीपक साळुंखे, संजय चौधरी,  बुटया पाटील, कन्हैया महाजन, आण्णा महाजन, भैय्या महाजन, बबलु मराठे, पापा वाघरे, बालु जाधव तसेच धरणगाव शहरातील अतिक्रमण धारक महिला व पुरुष यांच्यासह  पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.