शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण शेतकरी भूषण दत्तात्रय हाटे यांना ऑरियन एफएक्स रोबो कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष १४ डिसेंबर २०२२ रोजी त्याचा मित्र शेजल वराडे याने दिले.मी पण या कंपनीत गुंतवणूक केली असून तुलाही करायला हरकत नाही असे सांगितले. शेजल याने एका कमानीच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देऊन त्या संबंधित मॅनेजरने कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणुकेचे आमिष देऊन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

भूषण दत्तात्रय हाटे यांनी ॲप डाऊनलोड करून वेळावेळी एकूण ९ लाख ३० हजार रूपये ऑनलाइन भरले. एके दिवशी ॲपवर लॉगिन केल्यानंतर त्यांना २४,९१५ डॉलरचा नफा झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. पण, रक्कम निघाली नाही. त्यामुळे भूषण यांनी गुंतवणूकीची माहिती देण्याऱ्या मॅनेजरला संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने दोन दिवसात तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले. दोन दिवस उलटूनही रक्कम खात्यावर न आल्याने आणि पुन्हा संपर्क करूनही कुणीच प्रतिसाद दिला नसल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक प्रकार ध्यानात आला.
आपली फसवणूक झाल्याची खात्री भूषण यांना झाल्यानंतर सोमवारी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात येत तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.