खिडकीचे गज कापून चोरट्यांनी दीड लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

0

चोपडा :-घरातील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकारामुळे खळबळ उडाले आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की व्यापारी असलेले ज्ञानेश्वर कुंवर वय 42 चोपड्यातील रामकुंवर नगर मध्ये राहतात. 22 जुलै च्या पहाटे त्यांच्या घरात अज्ञात चार चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आज प्रवेश करून लोखंडी कपाटातील 47 हजाराची रोकड, साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टंगल, 21 हजाराची सोन्याची अंगठी, अठरा हजारांचे सोन्याचे कानातील टॉप, शे रुपये किमतीची घड्याळ असा एकूण एक लाख 46 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला याप्रकरणी ज्ञानेश्वर कुमार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अनोखी चार इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.