मोंढाळे येथे घरफोडी एक लाखांचा ऐवज लांबवला

0

पारोळा:- तालुक्यातील मोंढाळे येथे बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 21 जुलै ते 22 जुलै च्या दरम्यान उघडकीस आले याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील मोंढाळे येथे रहिवासी असलेले देविदास हिरामण पाटील वय 60 हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 21 जुलै च्या रात्री दहा ते 22 जुलै च्या सहा वाजेच्या सुमारास घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील दहा हजार रुपये रोख, हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या रिंगा, पंचवीस रुपये किमतीच्या तीन बार वजनाच्या चांदीच्या साखळ्या, तसेच गावातील इतर लोकांचे चोरीस गेलेले ७५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने,रोकड असा एकूण एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.