पोलिसांनी घडविली गुंडांना चांगलीच अद्दल, जिथे करायचे गुंडगिरी त्याच परिसरातून काढली धिंड

0

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तसे पहिले तर, पोलिसांचे काम हे आव्हानात्मक असत. कारण या जगामध्ये विकृत आणि राक्षसी प्रवृतींना आळा घालण्याचे काम पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करतात. गुन्हेगाराने किती गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी तो पोलिसांसमोर लपवू शकत नाही. गुन्हेगार आणि गुन्हा यांना आला घायलचे काम पोलिसांकडून होत असते. पण काही मुजोर गुन्हेगार मात्र गुन्हेगारी सोडत नाही. याउलट ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये अजून दहशद निर्माण करण्याचे काम करत असतात. पण त्यांची दहशद मात्र फार काळ काही टिकत नाही. कारण पोलीस त्यांच्या योग्य तो बंदोबस्त करण्यास सक्षम असतात. त्याचाच प्रत्येय औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला आहे.

भर परिसरात धिंड
पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड काढली. वर्चस्व वादातून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला होता. उज्जैन येथील दुर्लभ कश्यप या गुंडाला फॉलो करणारी ही टोळी आहे. गेल्यावर्षी त्यांनी एका चौकाला काश्यपचे नाव दिले होते. तेव्हापासून हि टोळी दहशद माजवत आहे.

पोलिसंनी नेमकी कशी अद्दल घडवली?
या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी कश्यप टोळीच्या पाच आणि विरोधी टोळीच्या एक अशा सहा जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना चांगलीच अद्द घडवली आहे. ते ज्या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी करायचे त्याच भागात पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या आरोपींना असाप्रकारे फिरविल्याने पोलीस निरीक्षक राजश्री आडे आणि पुंडलिकनगर पोलिसांचे नागरिकांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.