बसमध्ये चढताना प्रवाशाची वीस हजाराची रोकड लांबवली

0

चोपडा ;-येथील बस स्थानकावर बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून वीस हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार 31 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता सुमारास घडला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की चोपडा शहरात राहणारे भैय्यासाहेब विजय पाटील व 34 हे मेडिकल व्यावसायिक असून 31 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते चोपडा येथील बस स्टॅन्ड वरून चोपडा धरणगाव मार्गे जाणाऱ्या जळगाव बस क्रमांक एम एच २० बी एल च१४०७ या बस मध्ये चढत असताना त्यांच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खिशातून वीस हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरल्याचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे भैय्यासाहेब पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तात्काळ फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.