पारोळा तालुक्यात विवाहितेचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील सावरखेडे येथे विहिरीतून पाणी काढत असताना एका २८ वर्षीय विवाहितेचा शेवाळावर पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक ३० रोजी घडली.

राजु बाजीराव सोनवणे, वलवाडी (ता.जि.धुळे) यांनी पारोळा पोलिसांत खबर दिली की, अंजली राजु सोनवणे (वय २८), रा.वलवाडी ही दिनांक ३० रोजी सकाळी दहा वाजेचा सुमारास सावरखेडे (ता.पारोळा) येथे भिलाटी भागात विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली असता, विहिरीजवळ शेवाळावर तिचा पाय घसरल्याने विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. तिला विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढून खाजगी वाहनाने उपचाराकामी कुटिर रुग्णालय पारोळा येथे दाखल केले असता, तेथिल वैद्यकीय अधिकारी यांनी अजंली सोनवणे हिस तपासुन मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जयवंत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.