महाराजस्व अभियानांतर्गत चौगाव येथे सात बारा उताऱ्यांचे वाटप…

0

 

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चोपडा येथे नव्याने रुजू झालेले तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दि. 10 जुलै रोजी “शासन आपल्या दारी” योजनेंतर्गत चौगाव येथे भेट दिली. महा राजस्व अभियानांतर्गत मौजे चौगाव ता. चोपडा येथे गट स्किम लागू नसलेल्या एकूण एकवीस सात बारा उतारा संगणीकरणाचे काम गेल्या पंचवीस वर्षा पासून प्रलंबीत होते.आज रोजी सदरील सर्व शेतकर्यांचे सातबारा संगणीक्रुत करून त्यांना माननीय तहसिलदार साहेब भाऊसाहेब थोरात,नायब तहसिलदार, मंडळाधिकारी, तलाठी भुषण पाटिल व कोतवाल चंद्रभान कोळी यांच्या उपस्थितीमध्ये मोफत सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.

सदरील शेतकरी हे गेल्या पंचवीस वर्षापासून पिक विमा, पिक कर्ज, ठिबक सिंचन अनुदान योजना अशा तत्सम सर्व शासकीय योजनांपासुन वंचित होते. त्यांना आता हा लाभ घेता येणार आहे. रजान बारेला, कमलबाई पाटिल, नानेश्वर पारधी, संदिप धनगर, रमन पारधी, कमलबाई बाप, शामराव कोळी, ईश्वर पारधी, शांताराम पारधी, महेंद्र धनगर, कांतिलाल पाटिल, गणेश धनगर, गोकूळ कोळी आदी शेतकऱ्यांना सात बारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी शासनाच्या विविध योजनांची माहीती ग्रामस्थांना दिली.तर चौगाव गडाविषयी विश्राम तेले यांनी तहसिलदारांशी चर्चा केली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य शामकांत पाटील, मनोहर पाटिल, पिरण भिल, सुरेश धनगर, अरूण कोळी, बापुराव सकाराम, विशाल पाटिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.