मुख्यमंत्री अचानक जळगावात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज धुळ्यात शासन आपल्या दरी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी जात असताना खराब हवामानामुळे विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री महोदयांचे विमान धुळे विमानतळाऐवजी जळगाव विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

आज धुळे शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोज करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे वातावरण असल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला व मुख्यमंत्र्याचे विमान जळगावला उतरविण्यात आले आहे. ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे धुळे विमानतळावरून सिग्नल न मिळाल्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना जळगाव विमानतळावर उतरावे लागले. त्यानंतर जळगावहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वाहनाने धुळ्याकडे रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.