पहूर पेठ गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

पहूर पेठ गावात जाण्याचा मुख्य रस्ता त्वरित करण्याची मागण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पहूर, ता .जामनेर जळगाव-छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत वाघुर नदी वरील पुलाचे काम सध्या सुरू आहे .मात्र यामुळे बस स्थानकावरून पहूर पेठ गावात जाणारा मुख्य रस्ता अतिशय निमुळता झाला आहे.

या रस्त्याची चढण जीव घेणे झाली आहे पहूर हे गाव जळगाव- छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुलीवरील गाव आहे. पहूर पेठ गावाची लोकसंख्या पंधरा हजाराच्या आसपास असून संपूर्ण पहूर गावाचा रस्ता हा आता बांधलेल्या फुलाच्या डाव्या बाजूने होता पूल बांधल्याने नवीन फुलाचे काम अपूर्ण असल्याने व गावात जाण्याचा रस्ता न केल्याने गावातील लोकांना हायवेला ओलांडून पहूर कसबे कडून जीव मुठीत घेऊन गावात जावे लागते. आठवडे बाजाराच्या दिवशी तर या रस्त्याने चालणेही कठीण होते. बाजार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लागत असतात त्यामुळे आधीच रस्त्याची दैन्यअवस्था झाली असल्याने गावात जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पहूर पेठ गावात जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याची चढण जीव घेणे झाली आहे. यात पावसामुळे चिखल होऊन पायी जाणारे तसेच मोटरसायकलने येणारे तसेच जाणारे स्लीप होऊन पडत आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी या ठिकाणी बस अपघातात हात गाडीवर पोट भरणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला आहे.

यामुळे गावात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी चढण रस्त्यावरून जाताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. सदर रस्ता त्वरित वाहतुकीसाठी सुरक्षित रित्या तयार करावा, गावातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे या मागणीचे निवेदन ग्रुप ग्रामपंचायत पहूर पेठ, सांगवी-खर्चाने येथील ग्राम विकास अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभाग यांच्याकडे गेल्या काही दिवसापूर्वी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तरी पहूर पेठ गावात जाणारा मुख्य रस्ता त्वरित करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पहुर पेठ ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.