चोपडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

0

चोपडा ;- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ” श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन “चोपडा संस्थेचा उन्हाळी २०२३ परीक्षेचा निकाल नुकताच एमएसबीटीई बोर्डाकडून जाहीर झाला.

यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. आज दिनांक ०१/०७/२०२३ शनिवार रोजी या गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .

तरी सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. भैयासाहेब अॅड संदीप सुरेश पाटील, मा. आशाताई विजय पाटील उपाध्यक्षा, सचिव मा. ताईसो स्मिताताई संदीप पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्ही. एन. बोरसे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक वृंद तसेच तंत्रनिकेतन सहसमन्वयक अतुल पाटील उपस्थित होते.. कार्यक्रमात उपस्थित खालील गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती के सी वानखेडे यांनी केले. सदरील स्थापत्य विभागातून प्रथम वर्ष पाटील मोहित विश्वासराव ८५.४७% ,द्वितीय वर्ष पाटील विधी सत्यजित ७५.६३ % तर तृतीय वर्षातून निखील रवींद्र चव्हाण ७८.६७% प्रथम. विद्युत विभागातून प्रथम वर्ष चौधरी पियुश्का भगवान ८३.२५ %, द्वितीय वर्ष सोनावणे गिरीश कपिल ८६.४०% तर तृतीय वर्षातून बाविस्कर चेतन विलास ८२% प्रथम. संगणक विभागातून प्रथम वर्ष बडगुजर किशन दिनेश ८८.७५% ,द्वितीय वर्ष बडगुजर सपना अमर ८८.२७% तर तृतीय वर्षातून बोरसे प्रेम विजय ९३.७७% प्रथम व संस्थेतून प्रथम . तांत्रिक विभागातून प्रथम वर्ष चौधरी मनोज ललीत ८१.३३ % , द्वितीय वर्ष पाटील पुरुषोत्तम संजय ७०.५३% तर तृतीय वर्षातून पाटील विनय महेंद्र ७९.३३% प्रथम. वरील सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सत्कार करण्यात आला .

तसेच तंत्रनिकेतनाचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे व संस्थेचे अध्यक्ष मा.भैयासाहेब संदिप सुरेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले . विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.