शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

0

मुंबई – लोकशाही न्युज नेटवर्क –
विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ही निवडणूक संपताच महाराष्ट्रात दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली बघायला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या 7 जुलैला संपपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या चारही जागांसाठी 10 जूनला मतदान पार पडणार आहे. तर 13 जूनला मतमोजणी होणार आहे. मुबंई पदवीधर मतदारसंघावर सध्या विलास पोतनीस हे विद्यमान आमदार आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघावर निरंजन डावखरे हे विद्यमान आमदार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर किशोरे दराडे हे विद्यमान आमदार आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत. या सर्व आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा येत्या 7 जुलै 2024 ला संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.