मुंबईत १७ मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा

0

मुंबई ;- १७ मे रोजी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. पुढे बोलताना बाळा नांदगावकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्या सभेची तयारी करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. राज ठाकरेंची सभा आम्ही नेहमीच घेतो. त्यामुळे त्याची तयारी आम्ही नेहमीच करतो. तरीही कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागते.

त्यांचे म्हणणे, काही समस्या जाणून घ्याव्या लागतात. अन्य आवश्यक गोष्टी पाहाव्या लागतात. या बैठकीत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतील सर्व उमेदवारांसाठी होईल, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.