मनिषा ब्राम्हणकार सेंट परीक्षा उत्तीर्ण

0

चाळीसगाव ;- सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात खेडगाव येथील रहिवासी व चाळीसगाव येथे स्थायिक असलेले अरुण जगतलाल ब्राम्हणकार यांच्या सूनबाई व सुमित ब्राम्हणकार यांच्या पत्नी सौ मनिषा ब्राम्हणकार ह्या शिक्षणशास्त्र या विषयात उत्तीर्ण झाल्या असून परीक्षेला एकूण १०लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, पैकी सहा हजार विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आले.

सौ मनिषा ब्राम्हणकार ह्या भडगाव तालुक्यातील रोकडा फार्म येथील जि. परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून सेवेत आहेत, तर त्याचे पती ब्राम्हणकार हे इसापूर तांडा येथील जि. प. शाळेत उपशिक्षक म्हणुन सेवेत आहेत मनिषा ब्राम्हणकार यांच्या यशाबद्दल ब्राम्हणकार परीवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.