Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय अध्यक्षपदी अशोक जैन यांची एकमताने पुनर्निवड
    जळगाव

    श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय अध्यक्षपदी अशोक जैन यांची एकमताने पुनर्निवड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड झाली. श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय येथे रविवारी २ जुलै २०२३ रोजी मंदिर विश्वस्तांची बैठक पद्मालय येथे संपन्न झाली. त्यात सर्व विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाची घोषणा विश्वस्त अमित पाटील यांनी केली. विश्वस्तांच्यावतीने पुनर्नियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. अशोक जैन यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकताच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला.

    १ जुलै २०१८ रोजी पहिल्यांदा गणपती मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात निवड करण्यात आलेली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही सभा बोलवण्यात आली होती. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्वाची आवश्यकता असून त्यासाठी अशोक जैन यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात यावी, असा ठराव संस्थानचे विश्वस्त अमित पाटील यांनी मांडला. या ठरावास सर्व विश्वस्तांनी एक मताने मंजुरी दिली. त्यास भिका लक्ष्मण पाटील यांच्यासह सर्व विश्वस्तांनी अनुमोदन दिले. या वेळी संस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, आनंदराव पाटील व अमृत कोळी गोकुळ देशमुख, भिका पाटील, शिरीष बर्वे, डॉ. पी.जी. पिंगळे, अमित पाटील, गणेश वैद्य आदी विश्वस्त, अशोक पाटील डोणगावकर उपस्थित होते.

    देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होणार – अशोक जैन
    पर्यटकास पद्मालयाचे पौराणिक महत्त्व चित्र व म्युरल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसेल असे नियोजन आहे. या संस्थानला ‘ब’ दर्जा मिळाल्यामुळे नियोजीत कामांना वेग येऊन मंदिर आणि परिसराचा विकास होईल. या संस्थानचा सर्वतोपरी विकास साध्य करण्याचा संकल्प विश्वस्तमंडळाने घेतला आहे. भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल अशी खात्री आहे असे पुनर्निवड झालेले अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.

    Ashok Jain earandol jalgaon padmalay devsthan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif