लासूर किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळ निवडणुकीसाठी १२९ नामनिर्देशन

0

लासूर ता. चोपडा:-येथील किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या बिगुल वाजला असून निवडणुकीकरीता नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाली.दि.१२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या कालावधीत एकूण १२९ अर्ज प्राप्त झालेत .

 

यात अध्यक्ष पदासाठी १७,उपाध्यक्ष १५,सचिव पदासाठी २१ तर कार्यकारिणी सदस्य पदाकरीता ७६ अर्जांच्या समावेश आहे.लासूर परिसरातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळाची २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे.

 

नामनिर्देशन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकामी निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील,सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र महाजन यांनी काम पाहिले.१८ सप्टेंबर रोजी आलेल्या अर्जांची छाननी असून २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

एकूण अर्ज प्राप्त १२९
अध्यक्ष – १७
उपाध्यक्ष – १५
सचिव – २१
कार्यकारिणी सदस्य – ७६

Leave A Reply

Your email address will not be published.