Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»त्याने लग्नास नकार दिला; तिने त्याच्यावर चाकुने हल्ला केला… पाचोऱ्यातील धक्कादायक प्रकार…
    गुन्हे वार्ता

    त्याने लग्नास नकार दिला; तिने त्याच्यावर चाकुने हल्ला केला… पाचोऱ्यातील धक्कादायक प्रकार…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

    विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून, संतप्त तरुणीने तरुणावर धारदार चाकूने हल्ला करून तरुणास जखमी केल्याची धक्काडाय घटना घडली आहे, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमी तरुणावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    जखमी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून तरुणी विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.

    याबाबत पोलिसांकडुन प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील तलाठी काॅलनी येथील रहिवाशी निलेश दिलीप बोरसे यांचे विरुद्ध पाचोरा येथील तरुणीने सन – २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तद्नंतर वेळोवेळी तरूणी मुलाकडे माझ्या शी लग्न कर असा तगादा लावुन धरला होता. दरम्यान मुलाला नोकरी लागली. मात्र तरुणीने ही त्या तरुणाच्या नोकरीच्या ठिकाणी जावुन त्यास माझ्याशी लग्न कर अशी मागणी करत असल्याची माहिती पीडित तरुणाने बहिणीला दिली होती. १५ सप्टेंबर रोजी बहीण व भाऊ , आई  व वडिल हे पाचोरा येथे घरात असतांना, एक आवाज आला, आम्ही सर्व बाहेर आलो असता गेट जवळ आरोपी हिने तरुणाला पाहुन शिवीगाळ करत गेट उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणाच्या आणि यांनी तरुणी हिस शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. दरम्यान तरुणी हिने तिच्या जवळील चाकु काढुन मारणार तितक्यात तरुणाच्या वडिलांनी आरोपी हिचा हात धरला असता तरुणीने हिने त्यांना यांना लाथ मारली. त्यावेळी तरुण याचेसह गल्लीतील नागरिकांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने पुन्हा यास माझ्याशी लग्न कर नाहीतर तुम्हाला सर्वांना जिवंत सोडणार नाही. असे म्हणत असतांनाच हिने तिच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने मुलाच्या हातावर, मानेवर वार केले. या झटापटीत आरोपी मुलगी हिस आवरण्यासाठी गल्लीतील सतिष पाटील हे गेले असता त्यांना देखील चाकुने हाताला जखम झाली. घटनास्थळावरून पीडित मुलाचे आई व वडील दिलीप बोरसे व कमलाबाई बोरसे हे पोलिस स्टेशनला गेल्यानंतर, दरम्यान पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज येताच आरोपी ही घटनास्थळावरुन निघुन गेली. पीडित निलेश यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास परिवाराने येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले‌. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी निलेश यांची बहिण व वडील दिलीप बोरसे यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत आरोपी तरुणी हिच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी हिस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे हे करीत आहे.

    #crime #pachora #police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif