लासूर येथील जवान देवाजी माळी देशसेवेतून सेवानिवृत्त

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

लासूर ता.चोपडा येथील रहिवासी हवलदार देवाजी रामा माळी नुकतेच भारतीय सैन्यात २४ वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. हवालदार देवाजी माळी मराठा लाईट इन्फेंट्री रेजिमेंट या तुकडीत देशसेवा बजावत होते.

त्यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधत लासूर गावात वाजतगाजत त्यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान महिला भगिनींनी त्यांचे घरोघरी औक्षण केले. हवालदार देवाजी माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत सावता महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. त्यानंतर गावातील क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात ग्रामस्थांतर्फे शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिम्मतराव महाजन होते तर कार्यक्रमाप्रसंगी कैलास बाविस्कर, भावेश देवाजी माळी, सचिन पाटील, उपेंद्र पाटील तसेच अध्यक्षीय भाषणात हिम्मतराव महाजन यांनी आपले भारतीय सैन्याप्रती मनोगत व्यक्त केले. दरम्यान भारतीय सैन्यातील खडतर प्रवासाचे वर्णन याप्रसंगी हवालदार देवाजी माळी यांनी शब्दातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र महाजन यांनी केले.

याप्रसंगी पो.नि.कावेरी‌ कमलाकर, गोविंद दगा माळी, जितेंद्र माळी, प्रविण मगरे, कैलास बाविस्कर, देविलाल‌ बाविस्कर, उपेन्द्र पाटील, सचिन पाटील, सुरेश‌ महाजन, वासुदेव महाजन, प्रकाश महाजन, हिंमतराव महाजन, डॉ राजेंद्र महाजन, दिलीप पालीवाल, गोरख पाटील, देविदास सोमा मगरे तसेच देवाजी माळी यांच्या कुटुंबीय व माजी सैनिक, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.