पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  हस्ते रविवारी चाळीसगाव स्टेशनचा “अमृत भारत स्टेशन” योजनेत होणार शुभारंभ

0

162 वर्षानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट
चाळीसगाव :–देशातील दळणवळणात रेल्वे स्टेशनचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन योजना घोषीत केली आहे. या योजनेत चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने 165 वर्षानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशनला आधुनिकीकरणाचा साज मिळणारं असून या योजनेत चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आल्याने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. येत्या रविवारी दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता चाळीसगाव येथे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा समावेश असलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमासाठी चाळीसगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.

रेल्वे स्टेशनचा कायापालट
अमृत भारत स्टेशन योजनेद्वारे भारतीय रेल्वे बोर्डाकडून रेल्वे स्थानकांमध्ये टॉप प्लाझा, लांब प्लॅटफॉर्म, 5G कनेक्टिव्हिटी आणि बॅलेस्टलेस ट्रॅक इत्यादी विकसित केले जातील.या योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. विमानतळाच्या धर्तीवर हा आकर्षक मास्टर प्लॅन राबविला जाणार आहे.
या अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीकडे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी *सात्यत्याने पाठपुरावा करून चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश करुन घेतल्याने खासदार उन्मेशदादा पाटील यांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले जात आहे* अमृत भारत स्टेशन स्कीम 2023 या योजनेअंतर्गत रेल्वेच्या जुन्या इमारती नविन केल्या जाणार आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर नविन उंच इमारती बांधली जाणार आहे. प्रवाशांसाठी उत्तम प्रकाश व्यवस्था असलेल्या खोल्या तयार केल्या जातील. या योजनेच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म वरील नको असलेली बांधकामे हटवली जातील, नवीन रस्ता विकसित केले जातील, रस्ते रुंदीकरण, पार्किंग आदी कामे आधुनिकीकरणाद्वारे पूर्ण केली जातील. याशिवाय, ग्रीन पॅचव्दारे नागरिकांना स्थानिक कला आणि संस्कृतीत प्रवेश करण्यासाठी उच्च स्तरीय गार्डन करण्यात येईल. त्यामुळे *प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर विमानतळासारखा* एक खास अनुभव घेता येणार आहे.

चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सुमारें 162 वर्षापूर्वी पहिली रेल्वे धावली होती. येथून रेल्वेचा पहिला प्रवास 1 आक्टोंबर 1861 साली सुरू झाला. तर धुळे रेल्वेचा प्रवास 15 ऑगस्ट 1900 रोजी सुरू झाला. तेव्हापासून ते आजतागायत मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे या रेल्वे स्थानकावर झाली नाही. ही बाब खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे मांडली.चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून धुळे ,मालेगाव, कन्नड, भडगाव, नागद येथील जवळपासच्या प्रवाशांसाठी सोयीचे स्टेशन असल्याने येथून आता हजारो प्रवाशी ये जा करतात. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून या जंक्शन स्टेशनचा अमृत भारत योजनेतून लिफ्ट, सरकता जिना अशा आधुनिकीकरण सोयी सुविधा उपलब्ध केले जाणारं आहे.

चाळीसगाव येथे येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे*. यासाठी रेल्वे प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे. चाळीसगांवच्या इतिहासात हा मानाचा तुरा रोवला जात असल्याने* या समारंभास जास्तीतजास्त संख्येने विद्यार्थी ,कार्यकर्ते,पदाधिकारी, प्रवाशी संघटना, स्टेशन सल्लागार समिती तसेच समस्त चाळीसगावकर बंधू, भगिनी, यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.