पारोळा:- तालुक्यातील बाबळेनाग येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलास फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली.याबाबत मुलाच्या वडिलांनी पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विवेक शांताराम माळी वय १७,रा.बाभळेनाग (ता.पारोळा) हा दिनांक २६ रोजी सायंकाळी पाच वाजता आंघोळ करून बाहेर जाऊन येतो म्हणून सांगुन गेला होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्याचा आजूबाजूच्या परीसरात तसेच मित्र व नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने,याबाबत विवेक यास कोणीतरी अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याचे वडील शांताराम पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली,त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रविण पाटील करीत आहे.