“त्या नराधमास” अटक… ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून जीवे मारले होते…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महिला अत्याचाराच्या घटना संपूर्ण देशासह जिल्ह्यातही अधिक प्रमाणात घडतं आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात एक हादरवणारी घटना भडगाव घडली होती. ज्यात एका नराधमाने  ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात कुट्टी ( गुरांचा चार) मध्ये गाडला होता. मात्र आरोपी कितीही हुशार असो, कुठेतरी तो चुकतो आणि त्याचा गुन्हा उघडकीस येतो. त्याच प्रमाणे ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते. त्यावरुन स्थनिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, उप.निरी गणेश वाघमारे, गणेश चोभे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरिष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, दर्शन ढाकणे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यावरून वर नमुद पथकाने शोध सुरु केला असता दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी अल्पवयीन पिडीत मुलीचा मृतदेह भडगाव पो.स्टे. हद्दीत आरोपीच्या खळयातील (गोठ्यातील) कुट्टीचे डिगा जवळ चप्पल मिळून आली, त्यामुळे कुट्टीचा ढिग उपसून पाहिला, यावेळी पिडीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह त्यात आढळला. त्यामुळे पोलिसांनी तपासात खळयाच्या मालकाची व त्याच्या कुटुंबाची चौकशी केली.  या चौकशी दरम्यान मालकाचा मुलगा स्वप्नील उर्फ सोन्या पाटील, (१९)  ता. भडगाव जि. जळगाव याच्यावर जास्त संशय बळावल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. आणि त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान त्याला पुढील तपासासाठी भडगाव पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील व त्यांचे पथक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.