चोपडा ;- शहरातील लोहाना पेट्रोल पंपाच्या परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीच्या तपासा प्रकरणी चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली असून चार दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.
संजय नाना देवरे, रा. वडजाई, ता. जि. धुळे यांची दि. १२ जानेवारी रोजी रात्री चोपडा शहरातील लोहाना पेट्रोलपंपाच्या मागील भागातून एच.एफ. डिलक्स मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने पोलीस स्टेशन चोपडा शहर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ शेषराव तोरे यांनी सदर गुन्ह्यात संशयित आरोपी पवन संजय साळुंखे, रा. सुंदरगढी, चोपडा, अमोल राजेंद्र अहिरे, रा. खडगांव ता. चोपड़ा यांना अटक करुन तसेच १ विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल एम. एच. १८.ए.एम..८६६६ एच.एफ डिलक्स मोटार सायकल, या व्यतिरीक्त एम. एच. १९ बी बी ५००४ हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल, एम.पी. १० एन.ए.३४४४ एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल, विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची एच.एफ डिलक्स मोटार सायकल अशा एकुण अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीच्या चार मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
गुन्ह्यात दोन्ही संशयितांना अटक करुन त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि. ३१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर आरोपीतांकडुन आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ऋषिकेश रावले सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. के. के. पाटील , स.पो.नि. अजित सावळे, स.पो.नि.संतोष चव्हाण, पो.उप नि. घनशाम तांबे, सहा. फौ. सुनिल पाटील, पोहेकॉ शेषराव तोरे, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ दिपक विसावे, पोहेकॉ जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ शिवाजी धुमाळ, पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ प्रदिप राजपुत, पोना संतोष पारधी, पोना हेमंत कोळी, पोना प्रमोद पाटील, पोना मधुकर पवार, पोना संदिप भोई, पोना किरण गाडीलोहार, पोना ईश्वर धनगर, पोकॉ मिलींद सपकाळे, पोकों प्रकाश मथुरे, पोकों रविंद्र पाटील, पोकों प्रमोद पवार, पोकों विजय बच्छाव, पोकों सुमेर वाघरे, पोकों शुभम पाटील, पोकों आत्माराम अहिरे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.