अनोळखी ‘बंटी बबली’ने महिलेचे दागिने लांबविले

0

जळगाव ;- महिलेला बोलण्यात गुंतवून दोन जणांनी तिच्याकडे 67 हजार रुपयांचे दागिने लांबविण्याचा प्रकार

तांबापुर परिसरात उघडकीस आला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत सुशीला आनंदा कापडे वय ५३ ही महिला परिवारासह राहिला असून त्या शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तांबापुर मधील मच्छी मार्केट परिसरातून शिरसोली नाक्याकडे जात असताना रस्त्यामध्ये एक महिला व पुरुषाने त्यांना थांबवून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचालाकेद्वारे तिच्याजवळ 67 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले.   यात सुशीला यांच्याअंगावरील सोन्याचा गोप, सोन्याचे कानातले टोंगल, सोन्याचे डोरले असे एकूण ६७ हजारांचे दागिणे लांबविले. सुशीला कापडे यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अनोळखी महिला व पुरूषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल सचिन मुंडे हे करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.