शहरात गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा आढावा बैठकीत अवैध दारू विक्रीचा मुद्दा गाजल्यानंतर जिल्हा पोलिस दलाने शुक्रवारी (ता. २८) पाच ठिकाणी छापेमारी केली. वॉश आउट मोहीम राबवून जळगाव तालुक्यातील भोलाणे व देऊळवाडे या गावांत छापा टाकून पाच गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई केली.

गावठी दारूसह ८२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त केली आहे. एका पथकाने भोलाणे गावात छापा टाकून गावठी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली व ५२ हजार ७०० रुपयांचे कच्चे-पक्के रसायन व तीन हजार ७०० रुपयांची ८५ लिटर गावठी दारू जप्त केली.

दुसरी कारवाई पथकाने देऊळवाडे गावात केली. २४ हजार २०० रुपयांचे रसायन व दोन हजार २०० रुपयांची ५५ लीटर गावठी दारू जप्त केली. गोरख हरी सोनवणे व अनिल एकनाथ सोनवणे या दोघांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.