लोकशाही न्यूज नेटवर्क
कुस्ती खेळातील स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी २९ जुलै २०२३ रोजी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे.
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगावच्या बगली या गावाचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर ते तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, इतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.
‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स’ (World Police and Fire Games) हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरी यांनी उपांत्य फेरीत त्यांच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याचा सामना केला. त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोताशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा ११-०८ सहा फरकाने पराभव केला. अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर 10 गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत भारताला 125 kg मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले.