खंडणीची मागणी ; भावंडांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

0

भुसावळ : खंडणीची मागणी करीत दोघ भावंडांवर विळ्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच एकाच्या गळ्यातील चैन जबरीने चोरुन नेली. ही घटना दि. ३ मे रोजी ओमकारेश्वर मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रुपेश रवींद्र कानोजे (वय ३२) हा तरुण त्यांचा भाऊ सुरज कानोजे यांच्यासोबत वास्तव्याला आहे. रेल्वे कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते आपला व्यवसाय करत असतात. शुक्रवार दि. ३ मे रोजी सकाळी ९ वाजता त्याच परिसरात राहणार पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल हे दोघ रुपेश कानोजे

यांच्या घरी आले. त्यांनी खंडणीची मागणी केली. याला विरोध केला असता पवन मायकल आणि मीनाक्षी मायकल या दोघांनी लोखंडी विळ्याने रुपेश व त्याचा भाऊ सुरज यांच्यावर वार करत जखमी केले. रुपेशच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून लांबवल्याची घटना घडली. दरम्यान या प्रकरणी रात्री भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल दोन्ही रा. ओमकारेश्वर मंदिर, जवळ भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.