वाटार येथे सिलेंडरचा स्फोट तीन घरे खाक ; दोन जण जखमी

0

धानोरा ता . चोपडा;- पासून जवळच असलेले वाटर तालुका चोपडा येथे भीषण आग लागून तीन घरे जळूनखाक झाली . गॅस नळीतून गळती झाली आणी नंतर गॅस सिलेडरचा स्फोट झाला. गावात हळदीची पंगत असल्याने लहान मुलांसह सर्वजन जेवन करण्यासाठी गेलेले असल्याने जिवीतहानी टळली. आगीने लाखो रुपयाची आर्थिक हानी पीडीत कुटुंबाची झाली आहे.

वटार येथे काल सायंकाळी आठ वाजता अचानक आग लागली आगीत .कैलास भिका ठाकरे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग नियंत्रणाच्या बाहेर गेली . बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करून धनसिंग खंडू कोळी, भिकू बाई सुभाष कोळी, पांडुरंग सुभाष कोळी, यांची घरे यात जळून खाक झाली. यात या कुटुंबाचे ठिबक नळ्या शेती साहित्यसह अवजारे आधी घरातील धान्यासह सर्व साहित्य जळाले . यामध्ये सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग लागल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरतात सुटकार वडगाव अडावदकरांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले .चोपडा अग्निशमनच्या दोन तर जळगाव येथून आलेल्या एका बंबाने आग आटोक्यात आणली . मात्र आगीने चौघांचा संसार खाक केला . गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले रात्री उशिरा पर्यत आग आटोक्यात आणण्यात आली . घटनास्थळी नायब तहसीलदार सचिन बंबोडे मंडळ अधिकारी व्ही. डी. पाटील तलाठी महेंद्र पाटील अडावद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा व पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.