जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

0

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत झालेल्‍या तरूणाचे नाव आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामेश्वर कॉलनी परिसरातील चंद्रशेख सपकाळे हा पत्नी, आई व मुलासह राहत एमआयडीसी परिसरातील जलराम चटाई कंपनीत कामाला होता. त्याचे दोन भाऊ हे मिरचीचा व्यवसाय करतात. म्हणून शुक्रवारी आणि शनिवारी ३ जुन रोजी त्यांच्या व्यावसायात मदत करण्यासाठी गेला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेनंतर कामाच्या निमित्ताने एमआयडीसीतील त्याच्या कंपनीत गेला मात्र , रात्री उशीरापर्यंत चंद्रशेखर हा घरी न आल्याने त्याचा रविवारी ४ जून रोजी सकाळी ७ वाजता जलाराम चटाई कंपनीजवळील गोपाल दालमील कंपनीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. . एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. चंद्रशेखर याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी १० वाजता शविविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयताच्या पश्चात आई सुशिलाबाई, पत्नी छाया, मुलगा जयेश (वय-७), मनोज व शशिकांत हे दोन भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.