जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ; वातावरणात गारवा

0

असह्य उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा ; जोरदार वाऱ्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट

जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाकसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जळगावकरणा जाणवत असलेला उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला . यावेळी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. दरम्यान जोरदार वल्यामुळे शहरातील काही भागांमध्ये वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.


जळगाव जिल्ह्यासह पाऱ्याने चाळीशी ओलांडली असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उन्हामुळे नागरिकांचे जीवन जणू विस्कळीत झाल्यासारखे झाले होते. दुपारी घराच्या किंवा कामानिमित्त बाहेर पडायलाही मन धजावत नसल्याची परिस्थिती होती. आज ४ जून रविवार रोजी सकाळपासूनच ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळाला होता. मात्र दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यानं सुरुवात झाली. . यांनतर लक्ख काळोख दाटून आल्यानंतर पावसाने हजेरी लावली . त्यामुळे दुपारी विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला . आज रविवार असल्याने बाजारपेठेत फारशी वर्दळ नसतांना नागरिक आणि व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली . मात्र एकीकडे असह्य उकाड्यापासून पासून दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत खान्देशासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.