सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ मंदीराजवळ, राहूल संजय काकडे (वय-२२) सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ३ जून रोजी रात्री ९ वाजता सुप्रिम कॉलनीतील ममता बेकरीजवळून राहूल काकडे दुचाकीने जात असतांना त्याला गर्दीदिसली.गर्दी एक झाली याचे कारण विचारल्याच्या रागातून गर्दीतील आठ ते दहा जणांनी राहूल याला धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ८७९८) चे ही नुकसान केले. जखमीवस्थेत तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. राहूल काकडे याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.