यशवंतराव चव्हाण सेंटर जळगाव जिल्हा केंद्रच्या अध्यक्षपदी ॲड.रवींद्र पाटील

0

डॉ राहुल मयुर यांची सचिवपदी निवड

जळगाव ;- यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे कार्य समितीच्या बैठकीत जळगाव जिल्हा केंद्र याची 2023 ते 2026 या तीन वर्षासाठीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.त्यात अध्यक्षपदी ॲड.रवींद्र भैय्या पाटील व डॉ राहुल मयुर यांची सचिवपदी निवड नेमणूक करण्यात आली. तर कोषाध्यक्ष दी एन.डी.पाटील आणि सदस्य म्हणून सौ निशा जैन, प्रा. डी. पी. पवार,शंभू पाटील, ज्ञानेश मोरे, डॉ रेणुका चव्हाण आणि डॉ शीतल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले यांचे नियुक्तीचे पत्र जिल्हा केंद्राला प्राप्त झाले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात यशवंतराव चव्हाण सेंटर (जळगाव जिल्हा केंद्र) विविध उपक्रम राबवत आहेत तसेच या पुढेही विविध उपक्रम राबविले जातील व यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्राला विविध क्षेत्रातील सहकारी मान्यवर सदस्यांचे पण सहकार्य लाभत आहे असे ॲड.रवींद्र भैय्या पाटील व डॉ राहुल मयुर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.