चोपड्यातुन सव्वालाख किमतीच्या २५ बकऱ्या चोरल्या !

0

चोपडा ;- तालुक्यातील मौजे हिंगणे गावातील एका बकऱ्यांच्या शेड मधून अंदाजे सव्वा लाख रुपयांच्या २५ बकर्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मौजे हिंगणे गावात राहणारे रवींद्र पितांबर शिंदे यांचे बकऱ्याचे शेड असून ११ जून ते १२ जून च्या सकाळी सहा वाजे दरम्यान अज्ञात चोरटयांनी १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २५ बकर्या चोरून नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला . याप्रकरणी रवींद्र शिंदे यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ प्रदीप राजपूत करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.