एसटीची दुचाकीला धडक ; एक ठार , तीन गंभीर

0

यावल ;- तालुक्यातील बुर्‍हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मृत्यू झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे.

दि.१२ जुन रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बुर्‍हाणपुर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल साकळी दरम्यानच्या यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ यावलहुन चाळीसगाव जाणार्‍या एसटी बस क्रमांक एमएच 14 बिटी 2144 या वाहनचालक राजेन्द्र सोनवणे यावल आगाराची बसचा आणी मोटरसायकल एम पी 09 क्युटी 3939 या वाहनांचा भिषण अपघात होवुन यात दयाराम बारेला (वय 19) राहणार जामुनझीरा तालुका यावल हा जण ठार तर मांगीलाल कोशा बारेला (वय 28), सुनिता मांगीलाल बारेला (वय 25) आणी चिंकी बारेला (वय 3) सर्व शिरवेल जवळ खापर जामली येथील रहिवासी (मध्य प्रदेश) तिन जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान जख्मींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे या अपघाताबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.