पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

0

पारोळा ;– पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज
झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस असल्याने अनेक लहान मोठ्या व्यवसायिकांनी बाजारात आपली दुकान थाटली होती. तर सावलीसाठी अनेकांनी पाल बांधून सावली केली होती. तर काहींनी कापडी छत्र्या लावून सावली केली होती .

या अचानक आलेल्या वादळ वार्यात अनेकांचे पाल व छत्र्या उडुन गेल्याने अनेकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे, सकाळी असाह्य उकाड्यानंतर अचानक आलेल्या या मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली बाजारपेठेत ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेल्या नागरिकांना या पावसामुळे हाल सोसावे लागले अनेकांनी बाजारपेठेत काही खरेदी न करता काढता पाय घेतला यामुळे बाजारपेठेत काही वेळेतच शुकशुकाट जाणवत होता जवळपास एक तास जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यानंतर मात्र काही वेळेपर्यंत रिमझिम पाऊस पडतच होता,

या मान्सूनपुर्व पावसाने काही वेळेपर्यंत असाह्य उकाड्यापासून मात्र सुटका मिळाली तर दुसरीकडे वादळ वार्यामुळे किसान महाविद्यालय समोर विद्युत डीपीवर झाड पडल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच अनेक ग्रामीण भागात हि पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.