जळगाव-धरणगाव महामार्गावर भीषण अपघात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon)- धरणगाव (Dharangaon) महामार्गावर भीषण अपघात झाला असून, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असलेल्या खासगी बसचा ओव्हरटेकच्या नादात चालकाचे गाडीवरील ताबा सुटला आणि बस खड्ड्यात जाऊन पलटी झाली. रात्रीच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला असून २४ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अकोला येथील खाजगी बस अहमदनगर येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. या दरम्यान जळगाव सोडल्यानंतर धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी नजीक रात्री ८ च्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या कडेला पालटली. अपघातातील जखमींवर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील मदतीला

रविवारी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला असून, त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) हे पाळधी येथील निवास्थानी जात असतांना आपली गाडी थांबवून तात्काळ जखमींना रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.