अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर

0

चोपडा ;- चोपडा तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 23 वर्षीय तरुणाने गरोदर केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी अडावट पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील एका गावातील परिवार ऊस तोड कामासाठी चोपडा तालुक्यातील एका गावात आलेले असताना दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ यादरम्यान या परिसरातील एका 23 वर्षीय संशयित आरोपी सागर मोरे याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी राहण्याच्या झोपडीत येत तिच्यासोबत अत्याचार करीत तिला गरोदर केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस स्थानकात संशयित आरोपी सागर मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अडावद पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एपीआय गणेशपुरी बुवा हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.